दाभड येथील बौद्ध धम्म परिषदेत मंगेश कदम मित्रमंडळाच्या वतीने अन्नदान वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 8 January 2023

दाभड येथील बौद्ध धम्म परिषदेत मंगेश कदम मित्रमंडळाच्या वतीने अन्नदान वाटप

जयवर्धन भोसीकर

नांदेड

अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील महाविहार बावरीनगर येथे आखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेत उपस्थित असलेल्या भीम अनुयायांना मंगेश कदम मित्र मंडळाच्या वतीने अन्नदान वाटप करण्यात आले असल्याची माहिती आयोजक विक्की गायकवाड यांनी दिली आहे.

 महाविहार बावरीनगर दाभड येथे दि. 6 व 7 जानेवारी रोजी 36 व्या आखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या धम्म परिषदेला लाखो भीम अनुयायांची उपस्थिती होती.नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या मंगेश कदम मित्र मंडळाने दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील भीम अनुयायांना अन्नदान वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. या प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य तथा  नगरसेवक प्र.मंगेश दादा कदम,पत्रकार संरक्षण समितीचे  जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या वेळी मंगेश कदम मित्रमंडळाचे सिद्धार्थ वाठोरे,सुरेंद्र खंडाळीकर,योगेश गच्चे,सुमेध सोनकांबळे,सुमेध साळवे,विशाल चिंतारे ,दीपक जोंधळे,आदी नरवाडे,सुशांत सोनकांबळे,शुभम गायकवाड,करण बिऱ्हाडे,अमित लिंबेकर,विकी गायकवाड यांच्यासह मित्रमंडळाचे असंख्य कार्यकर्ते  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages