जेष्ठ व्हायोलिन वादक प.प्रभाकर धाकडे यांचे निधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 8 January 2023

जेष्ठ व्हायोलिन वादक प.प्रभाकर धाकडे यांचे निधन


नागपूर : ज्येष्ठ व्हायोलिनवादक, संगीतकार सूरमणी पं. प्रभाकर धाकडे यांचे शनिवारी ( 7 जानेवारी) सायंकाळी अल्पशा आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी उर्मिला, तीन मुले मंगेश, कौशिक, विशाल आणि मोठा आप्तपरिवार आहे. रविवारी ( ता.08) सकाळी 11 वाजता मोक्षधाम घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. 25 ऑक्टोबर 1949 रोजी आरमोरी येथे जन्मलेल्या प्रभाकराव धाकडे यांना अपघातामुळे वयाच्या तिसऱ्या वर्षी कायमचे अंधत्व आले. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना माता कचेरीच्या अंध शाळेत दाखल करून घेतले.


प्रभाकर धाकडे यांना वडिलांकडून संगीताचा वारसा मिळाला. अंधशाळेत त्यांनी बनानराव कन्हेरकर, पाठक मास्तर, केशवराव ठोंबरे यांच्याकडून व्हायोलिन आणि पितळवार यांच्याकडून तबला शिकला. पदवीनंतर, 1967 मध्ये, ते एससीएस गर्ल्स हायस्कूलमध्ये संगीत शिक्षक म्हणून नोकरीला लागले. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी उत्तर नागपुरातील इंदोरा भागात वडिलांनी सुरू केलेल्या भास्कर संगीत विद्यालयाची जबाबदारी स्वीकारली. ते ऑल इंडिया रेडिओचे अ श्रेणीचे कलाकार होते.


जपानमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवात त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. मुंबईच्या सूरसिंगार संगीत संस्थेने त्यांना सूरमणी ही पदवी बहाल केली. त्यांच्या संगीत दिग्दर्शनात रवींद्र साठे, सुरेश वाडकर, उत्तरा केळकर आदी कलाकारांनी गाणी सादर केली. गेल्या महिन्यात झालेल्या संसद सांस्कृतिक महोत्सवात त्यांनी व्हायोलिन वाजवले आणि हा त्यांचा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम


धम्मदीक्षा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त अभि. प्रशांत ठमके यांच्या अध्यक्षते खालील संयोजन समितीने किनवट (जि. नांदेड ) येथील शहीद गोंडराजे मैदानात आयोजित केलेल्या बौद्ध धम्म परिषदेत त्यांच्या संगीत संयोजनात धम्म सांस्कृतिक संध्या हा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला होता.

No comments:

Post a Comment

Pages