तालुका क्रीडा अधिकारी श्री .स.गुरुदीपसिंघ प्रेमसिंघ संधु सरांचा सेवापुर्ती सोहळा कार्यक्रम किनवट येथे संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 8 January 2023

तालुका क्रीडा अधिकारी श्री .स.गुरुदीपसिंघ प्रेमसिंघ संधु सरांचा सेवापुर्ती सोहळा कार्यक्रम किनवट येथे संपन्न

किनवट :

   किनवट येथे प्रदिर्घ सेवेतुन संधु सरांचा सेवापुर्ती सोहळा घेण्यात आला.श्री स.गुरुदीपसिंघ प्रेमसिंघ संधु हे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातुर येथे 1992 साली क्रीडा आधिकारी म्हणुन रुजु झाले होते येथुन आपल्या सेवेला सुरुवात केली होती तर ते सध्या जिल्हा क्रीडाअधिकारी कार्यालय नांदेड मध्ये किनवट तालुका क्रीडा अधिकारी म्हणुन किनवटला कार्यरत होते आणि त्यांची आपली एकुन 32 वर्ष सेवा दिली .ते प्रदिर्घ सेवेतुन.31 डिसेंबर 2022 रोजी निवृत झाले.त्यांचा किनवट क्रीडा समिती किनवट आयोजित  दि.08 जानेवारी 2023 वार रविवार सकाळी 11:30 वा.  क्रीडा संकुल इंनडोर हाॅल किनवट येथे घेण्यात आला.क्रार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मुकुंद तिरमनवार हे होते तर प्रमुख पाहुने श्री.हैदर शेख सर ..प्रमुख उपस्थिती श्री.तांदळे प्रेम सर(क्रीडा संयोजक ,किनवट),श्री गिरीष नेम्मानीवार ( राष्ट्राय खेळाडु व्हालीबाॅली) श्री.पठाण जुम्माखाँ , श्री.संदीप इसाई सर,श्री,रामराव राठोड सर तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आर जी राठोड सरांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन श्री .संतोष मुंढे सर,श्री .सय्यद फराहन सर,श्री संदिप एशिमोड सर श्री.करण मुंढे सर यानी केले होते.श्री शेख हैदर सर,श्री,तांदळे सर,श्री गिरीष नेम्मानिवार श्री.पठाण सर,श्रीरामराव राठोड सर श्री संतोष मुंढे सर श्री गुरुदीपसिंघ संधु सरांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदाना बद्दल व त्यांच्या  केलेल्या कार्यांचा अलेख कार्यक्रमाला उपस्थित क्रीडा शिक्षक व खेळाडु समोर ठेवला.तर संधु सरांनी आपल्या भाषणात आपल्या कार्याचा अनुभव कार्यक्रमात जमलेल्या खेळाडु व क्रीडा शिक्षका समोर ठेवला. तर अध्यक्षीय भाषणामध्ये श्री.मुंकुद तिरमनवार यांनी संधु सरांनी क्रीडा संकुलची स्थापना करण्यापासुन किनवट तालुक्यातील खेळाडुंना राज्यस्तर पोहचवण्या मधिल त्यांचे योगदान तसेच त्यांचा मनमिळाऊ स्वभाव प्रेमळवृत्ती त्यांच्या व्यक्तिमत्वाचा लेखाजोखा कार्यक्रमाला जमलेल्या क्रीडाशिक्षक व खेळाडु समोर ठेवला.आणि आतापर्यंतच्या सहकार्या बद्दलसंधु सरांचे धन्यवाद केले व पुढे सहकार्य कराल आशी आशा संधु सरांकडे केली तर आभार श्री .रामराव राठोड यानी केले.

No comments:

Post a Comment

Pages