जयवर्धन भोसीकर
नांदेड- नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री डीपी सावंत, विधान परिषद काँग्रेस पक्षाचे गटनेते अमरनाथ राजुरकर, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थची हत्ती आंबिरे यांनी मंगेश कदम यांना आज माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. मंगेश कदम यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून काँग्रेस पक्षासाठी चांगले काम केले असून या अगोदर ते अध्यक्ष नांदेड तालुका युवक काँग्रेस, माजी पंचायत समिती सदस्य, नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष , नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी सचिव,नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नगरसेवक प्रतिनिधी अश्या अनेक पदावर अतिशय चांगले काम केले असल्यामुळे त्यांना आज माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते शहर जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आले त्यावेळी त्यांचे माजी मंत्री डीपी सावंत विधान परिषदेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते अमरनाथ राजूरकर माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर आमदार मोहनराव हंबर्डे आमदार जितेश अंतापुरकर काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर,दिलीप पाटील बेटमोगरेकर,संजय बेळगे, श्रीनिवास पाटील चव्हाण, सतीश देशमुख तरोडेकर, राजकुमार येंगडे,गंगाधर सोंडारे,प्रफुल सावंत, एडवोकेट धम्मपाल कदम,करुणा जमदाडे,महेंद्र गायकवाड विकी गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment