वीज कर्मचारी बहात्तर तासांच्या संपा वर जाणार- भाई वागरे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 2 January 2023

वीज कर्मचारी बहात्तर तासांच्या संपा वर जाणार- भाई वागरे

नांदेड : महावितरण महाराष्ट्र राज्य वीज उद्योगात कार्यरत सर्वच 30 संघटनांनी एकत्र येऊन महावितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या भांडुप, ठाणे ,मुलुंड, नवी मुंबई, पनवेल, खारघर ,उरण ,तळोजा ,या नफ्याच्या क्षेत्राचे समांतर वीज वितरण चा परवाना में अदानी इलेक्ट्रिकलने वीज विद्युत नियमक आयोगाकडे मागितला आहे .

म्हणजेच वीज वितरण कंपनीचे खाजगीकरण करण्याची सुरुवात झाली आहे.

 असे संघर्ष समितीमध्ये सहभागी कामगार संघटनाचे मत आहे. राज्य सरकारच्या या धोरणाचा कडाडून विरोध करण्याची भूमिका एकमताने संघर्ष समितीने घेऊन या आधी अनेक प्रकारचे आंदोलन टप्याटप्याने केले आहेत. असा प्रकारे 4 जानेवारी 2023 बुधवार पासून तीन दिवसांच्या संपत विज कंपनीच्या सर्व संघटनेचे कामगार  सहभागी होणार आहेत.

हा संप यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनाचे नांदेड , परभणी, हिंगोली,येथील सेकडो कामगारांना संपात सहभागी होण्याचे आव्हान औरंगाबाद प्रादेशिक विभागाचे सल्लागार भाई प्रकाश वागरे , झोन अध्यक्ष नागेश खिल्लारे,झोन सचिव एस. बि. बुकतरे, सर्कल अध्यक्ष साईनाथ नागभिडे, सचिव सुनील टिपरसे, परभणी अध्यक्ष राहुल घोडके, सचिव बालाजी खिल्लारे, हिंगोली सर्कल अध्यक्ष संदीप इंगोले, सचिव डिंगाबर पालवे,अदिनी केलें आहे.


No comments:

Post a Comment

Pages