नांदेड , जयवर्धन भोसीकर:
नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ.ज्योती मनिष कदम यांनी तरोडा बू भागातील नालंदा नगर येथील बुद्ध बुद्धविहारच्या विविध विकास कामासाठी आपल्या स्वेच्छा निधीतून 30 लक्ष निधी दिला आहे.
नालंदा नगर येथे भीमा कोरेगाव व नवीन वर्षाचे औचित्य साधून बुद्ध विहारात नगर सेविका कदम यांनी दिलेल्या निधीतून होणाऱ्या विविध विकासकामाचे भूमिपूजन तरोडा येथील नगरसेवक प्रतिनिधी मंगेश कदम,महेश देशमुख, स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी ,अँड धम्मपाल कदम,महेंद्र गायकवाड यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी मंगेश कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आमचे नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण,माजी मंत्री डी. पी.सावंत व विधान परिषद सदस्य अमरनाथ राजूरकर यांच्या सूचनेनुसार बुद्ध विहारच्या विकासासाठी निधी दिला असून हा निधी अपुरा पडल्यास स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी यांच्या माध्यमातून अजून निधी उपलब्ध करून देऊ. मंगेश कदम यांनी या प्रभागातील सर्वच नगरसेवकांचे यावेळी आभार मानले.
या प्रसंगी के. एच.वने, प्रा.सुर्यकांत कदम,प्रा. शिधोधन गायकवाड, सोनाजी अटकोरे, सिद्धार्थ महाबळे,खिरडे सर,मोतीराम गवळे,गौतम सोनकांबळे, पुरुषोत्तम कांबळे, सुधाकर सरोदे, महागडे सर, नाहारे सर, ससाणे ताई,डोंगरे मावशी,कसबे ताई,कांबळे मावशी,सोनकांबळे मावशी,युवराज थोरात,राहुल गाजभरे, छोटू येडके,दिपक नरवाडे,मंगेश गजभारे, धम्मा कांबळे,विष्णू कांबळे,माधव महाबले,आजिंक्या अटकोरे,मंगेश कांबळे,प्रदीप भद्रे,चंद्रमणी कोलते,सुगत भद्रे,नागेश लोणे,सतीश हस्नाळकर, आनुराग ससाणे, हे उपस्थीत् होते.नव वर्षाचे औचित्य साधून यावेळी बुद्ध विहारात खीरदानाचा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमांस महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment