धम्माश्रय युवा विचार मंच च्या वतीने शौर्य दिनानिमित्त भैयासाहेब आंबेडकर सभागृह येथे शूरवीरांना अभिवादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 2 January 2023

धम्माश्रय युवा विचार मंच च्या वतीने शौर्य दिनानिमित्त भैयासाहेब आंबेडकर सभागृह येथे शूरवीरांना अभिवादन

नांदेड :     

1818 साली झालेल्या युद्धात विषमतावादी व्यवस्थेवर विजय मिळवून अस्मितेची वागणूक जपली. त्या युद्धात समाविष्ट योध्यांचा गौरव म्हणून त्यांना 1 जानेवारी रोजी कोरेगाव येथे विजयस्तंभ ठिकाणी  मानवंदना दिली जाते.

 मागील सात वर्षांपासून   त्याच विजयस्तंभाची प्रतिकृती साकारून भैय्यासाहेब आंबेकर सभागृह प्रभात नगर नांदेड येथे 205 वा शौर्यदिन परिसरातील बौद्ध अनुयायांच्या मार्फत शुर वीरांना मानवंदना देण्यात आली. यावेळी प्रभात नगर, कुशी नगर आणि लुंबिनी नगर परिसरातील बौद्ध उपासक आणि उपसिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमास  पंडित बाई,डोईबळे बाई,वाटोरे बाई, गोवंदे सर संदीप वाटोरे, संबोदीत कांबळे तुषार खरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

धम्माश्रय युवा विचार मंच चे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.No comments:

Post a Comment

Pages