बार्टी फेलोशिपधारक सांशोधकांना न्याय द्यावा - विद्यार्थ्यांचे महाआघाडीच्या नेत्यांना निवेदन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 16 January 2023

बार्टी फेलोशिपधारक सांशोधकांना न्याय द्यावा - विद्यार्थ्यांचे महाआघाडीच्या नेत्यांना निवेदन

औरंगाबाद: आज दिनांक १४ जानेवारी रोजी डॉ.अरुण शिरसाट, शहर जिल्हाध्यक्ष, औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जा.विभाग यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उपनेत्या मा.सुष्माताई अंधारे यांना एम.फील च्या २०१९-२० च्या संशोधकांना सलग पाच वर्षे फेलोशिप देण्यात यावी याकरिता सविस्तर निवेदन देण्यात आले, निवेदन दिल्यानंतर सुष्माताई यांनी लवकरच त्यांच्या वतीने बार्टी संचालकांसोबत चर्चा करून सलग पाच वर्षे फेलोशिप देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत आश्वासन दिले  यावेळी विद्यार्थी नेते प्रा.शिलवंत गोपणारायन हे प्रामुख्याने उपस्थित होते. निवेदनावर प्रा.सोनाजी गवई, शरद डुमने, कैलास अवसर मोल, चंद्रमुनी वाकळे, विकास सोनवणे, अमित साळवी, दीपक पाईकराव   ,सोनाली अवसरमोल   अमरदिप हिवराळे ,प्रभू राऊतआदी शंशोधक विध्यार्थ्यांच्या सह्या आहेत.

           डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २९ व्या नामविस्तार दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सतीश चव्हाण, विक्रम काळे, नाडकुमार  घोडेले,  सुष्माताई अंधारे, चंद्रकांत खैरे, शेख युसूफ, प्रा.सुनील मगरे आदी महाविकास आघाडीचे नेते मंडळी सभेसाठी औरंगाबाद येथे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages