आरोग्य विभागाला मुख्यालयी न रहाणे, उशीरा येणे, गैरहजेरी, प्रतिनियुक्ती व रिक्त पदाचे लागले ग्रहण; तालुक्यातील आरोग्य सेवा वा-यावर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 15 January 2023

आरोग्य विभागाला मुख्यालयी न रहाणे, उशीरा येणे, गैरहजेरी, प्रतिनियुक्ती व रिक्त पदाचे लागले ग्रहण; तालुक्यातील आरोग्य सेवा वा-यावर


किनवट,दि : तालुक्यात एक उपजिल्हा रुग्णालय ,एक ग्रामीण रूग्णालय,९ प्राथमिक आरोग्य  केंद्रे व  ६५ आरोग्य  उपकेंद्रे  आहेत.परंतु, तालुक्यातील  आरोग्य विभागाला मुख्यालयी न रहाणे, उशीरा येणे ,गैरहजेरी, प्रतिनियुक्ती व रिक्त पदाचे  ग्रहण लागल्याने तालुक्यातील १८२ गावातील  १लाख ८५ हजार ७५२ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

तालुक्यातील विविध रुग्णांलयात कार्यरत असलेल्या  अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अन्य कर्मचारीही मुख्यालयी रहात नसल्याने, उशीरा येत असल्याने ,गैरहजर रहात असल्याने व प्रतिनियुक्तीवर  अन्यत्र कार्यरत  असल्याने    तालुक्यातील  आरोग्य  सेवा ही  रामभरोसे असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

     किनवटच्या गोकुंदा येथिल उपजिल्हा रुग्णालयात मधुमेह, रक्तदाब, बाल रुग्णांच्या औषधे उपलब्ध नाहीत.एक्सरे टेक्निशिन उपलब्ध नाही.तसेच साध्या साध्या औषधेही उपलब्ध नाहीत.चार महीन्याला येतील की,सहा महीन्याला येतील हेही सांगता येत नाही,असे येथिल  कर्मचाऱ्यांचे म्हणने आहे.यासंर्भाने अधिक माहिती घेण्यासाठी रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक  डॉ .घडसिंग यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क  होऊ शकला नाही.तालुक्यातील बहुतांश रुग्णालयातील कार्यरत परिचारिका, आरोग्य कर्मचारी, समुदाय अधिकारी व सुपरवायझर हे मुख्यालयी रहात नाहीत.त्यामुळे शासनाने लाखो रुपये खर्च करून बांधलेलेल्या रुग्णालयांच्या इमारती या शोभेच्या वास्तू ठरत आहेत.वेळेवर लसीकरण न होणे, राष्ट्रीय आरोग्य योजनेची योग्य अंमलबजावणी न होणे,गरोदर मातांची प्रसुती आदी सुविधां याही मिळेनास्या झाल्या आहेत.

परिणामी प्रसुतीसाठी महीलांना आदिलाबाद ,यवतमाळ,पुसद किंवा नांदेडला घेऊन जाण्याची वेळ येत आहे.जिल्हा शल्य चिकित्सकांनी व  तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाने  तालुक्यातील  वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश देण्यात यावेत,अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. परंतु,तालुका आरोग्य अधिकारी हेच प्रभारी असल्याने ते उपकार करावे या भावनेने कधीमधी जमेल तसे व जमेल त्या वेळी तालुका आरोग्य केंद्राला भेट देत असल्याने कुंपनच शेत खात असल्याची भावना नागरिकांची झाल्याने  तक्रार तरी करावी कुठे अशी  वेळ तालुक्यातील  नागरिकांवर आलेली आहे.यातच तालुक्यातील लोकप्रतिनिधींनाही आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष ठेवण्यासाठी वेळ ही मिळेनासा झालेला आहे,हे या तालुक्याचे दुर्दैवच म्हणावे लागेल.


No comments:

Post a Comment

Pages