नांदेड /जयवर्धन भोसीकर :
दि.17 जानेवारी 2023 ते 15 फेब्रुवारी 2023 कालावधीत परभणी ते चैत्यभूमी दादर, मुंबई पर्यंत भव्य बौद्ध धम्म पदयात्रा निघत आहे. धम्म पदयात्रेचा भव्य प्रस्थान सोहळा दि.17 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11.30 वा. ज्ञानोपासक महाविद्यालय मैदान, जिंतूर रोड, परभणी येथे संपन्न होणार आहे. या सोहळयाचे मुख्य आकर्षण म्हणजे तमाम बौद्धांना परम आदरणीय असलेल्या तथागत बुद्धांच्या थायलंड येथे जतन केलेल्या व ऐतिहासिक नोंद असलेल्या अस्थी विशेष राजदूता मार्फत भारतात पहिल्यांदाच येत आहेत. आम्ही केलेल्या अथक प्रयत्नातून या पवित्र अस्थी भारतात येत आहेत. तरी सर्वांनी पवित्र अस्थी-दर्शनाचा लाभ घ्यावा असे मुख्य समन्यक मा.नगरसेवक धम्म कार्यात सर्वात पुढे असणारे उपासक मंगेश कदम यांनी आवाहन केलं आहे या धम्म पद यात्रेचे मुख्य आयोजक सिद्धार्थ हतीअंबीरे हे आहेत..तरी जास्तीजास्त संख्येने सर्वांनी पवित्र अस्थीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मा.नगरसेवक मंगेश कदम,सह समन्वयक यांनी केले आवाहन केलं आहे.
No comments:
Post a Comment