पैनगंगा नदीपात्रातील रेतीची तस्करी करतांना दोन ट्रॅक्टर्ससह दोन तस्कर जेरबंद - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 13 January 2023

पैनगंगा नदीपात्रातील रेतीची तस्करी करतांना दोन ट्रॅक्टर्ससह दोन तस्कर जेरबंद

किनवट. दि.13(प्रतिनिधी) : पैनगंगेच्या मदनापूर रेती घाटातून चोरट्यामार्गाने रेतीचे उत्खनन करीत असतांना मंगळवारी (दि.10) रात्री 10 वाजण्याच्या दरम्यान खरबी आणि किनवट वनविभागाच्या संयुक्त पथकाने दोन रेती तस्करांना ट्रॅक्टर्ससह  रंगेहात पकडण्यात यश मिळवले आहे. रात्री अंधाराचा फायदा घेत उर्वरीत चोरटे रेतीने भरलेले कांही टॅ्रक्टर घेऊन पसार झाले.  किनवट वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी प्रमोद राठोड व  खरबीचे वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन आटपाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कार्यवाही राबविली गेली.


     मदनापूर रेती घाटातून रेतीचा उपसा होत असल्याची खबर मिळाल्यावरून  किनवट वनविभागातून वनपाल सटवा सांगळे, विजय शिंगनजुडे, प्रदीप बाकडे, संजय कोंपलवाड, सुहाग कानडे, आश्विन मुजमुले, बालासाहेब काशिदे, ज्ञानेश्वर ठाकरे, कुहीरे, बाळकृष्ण आवळे, तौसिफ पठाण, बालाजी बोईनवाड, कृष्णा भेंबरे, संजय वंजारे, विनायक कागणे यांचे पथक तत्काळ मदनापूर रेतीघाटावर पोहोचले. पैनगंगे पलीकडून खरबी वनविभागाच्या ताफ्यासह कोरटा रेंजचे वनक्षेत्रपाल विनायक खैरनार यांच्याही टीमचे सहकार्य घेऊन सर्वजण घटनास्थळी पोहोचले. तस्करांची संख्या जास्त व पथकांमध्ये संख्याबळ कमी असतांनाही मोठ्या धाडसाने सर्वांनी मिळून रेतीने भरलेले दोन ट्रॅक्टर्स आणि दोन रेती तस्करांना जेरबंद केले.  मात्र, निबिड अंधाराचा लाभ घेत  कांही ट्रॅक्टर्स घेऊन चोरटे पळून गेले. अटक केलेल्या आरोपींची नावे मारोती शिवाजी केंद्रे व रविंद्र जळबा डरले असे असून, वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांना न्यायालयाकडे नेण्यात आले.


पांढरकवड्याचे विभागीय वन अधिकारी किरण जगताप आणि उमरखेडचे सहायक वनसंरक्षक भारत खेलबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली खरबीचे वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन आटपाडकर हे पुढील तपास करीत आहेत. सदर तपासात कोणकोण अडकतील आणि किती ट्रॅक्टर्स पकडल्या जातील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

No comments:

Post a Comment

Pages