धम्म ग्रंथांच्या ज्ञानप्राप्तीने नव्हे तर धम्माचरणानेच माणसाचे कल्याण - पूज्य भदंत इंदवंश महाथेरो यांची धम्मदेसना ; महाबोधी वंदना आणि धम्म ध्वजारोहणाने बावरीनगर धम्म परिषदेला सुरुवात - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 6 January 2023

धम्म ग्रंथांच्या ज्ञानप्राप्तीने नव्हे तर धम्माचरणानेच माणसाचे कल्याण - पूज्य भदंत इंदवंश महाथेरो यांची धम्मदेसना ; महाबोधी वंदना आणि धम्म ध्वजारोहणाने बावरीनगर धम्म परिषदेला सुरुवात


 नांदेड, (प्रतिनिधी)- महाकारूणीक तथागत भगवान बुद्धांचा धम्म हा विशाल धम्म सागर आहे. चौ-याएशी हजार धम्म स्कंधात गुंफलेला त्रिपिटक हा ग्रंथ मानवाच्या कल्याणाचा सर्वोत्तम मार्ग आहे. त्रिपटक हा ग्रंथ महान आहे, शाश्वत आहे, सुखदायी आणि हितकारक आहे, हे सर्वांना ज्ञात आहे. परंतु धम्म ग्रंथाच्या ज्ञानाने नव्हे तर धम्माच्या आचरणाने माणसाचे कल्याण साधले जाईल, असा धम्मोपदेश भिख्खु इंदवंश महाथेरो यांनी केला.


 महाविहार बावरीनगर दाभड येथे आजपासून ३६ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला धम्ममय वातावरणात सुरुवात झाली. याप्रसंगी धम्मदेसना देताना भिख्खू इंदवंश महाथेरो बोलत होते.


 तीर्थक्षेत्र महाविहार बावरीनगर येथे सकाळी महाबोधि वृक्षाचे भिख्खू संघाच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले. त्यानंतर श्रीलंका येथील भदंत बंडारवेल पैयाशिरी थेरो यांच्या हस्ते पंचरंगी धम्म ध्वजारोहण झाले. श्रीलंकेतील भदंत कश्यप थेरो यांनी प्रारंभी सिंहली भाषेतून धम्मदेशना दिली. भदंत पैयारत्ना यांनी मराठी मधून या देसनेचे समालोचन केले.


दोन दिवसीय धम्म परिषदेत आज पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात श्रीलंका येथील सुमारे वीस भिकूंचा संघ सहभागी झाला. यावेळी उपासक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


 पूज्य भदंत धम्मसेवक महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या ३६ व्या अखिल अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेत श्रीलंकेचे खासदार अतुरलिये रतन थेरा, इंग्लंड येथील पूज्य भिख्खू चंद्रबोधी महाथेरो, भिक्खू डॉ. उपगुप्त महाथेरो आदींचा सहभाग आहे. महाविहार बावरीनगर तीर्थक्षेत्र विकास सुकाणू समितीचे कार्यकारी अध्यक्ष तथा धम्म परिषदेचे मुख्य संयोजक महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनात परिषदेला सुरुवात झाली आहे.



No comments:

Post a Comment

Pages