नांदेड दि.२६- कर्ज मर्यादा दुप्पट करून व्याजदर स्थिर ठेवण्याबरोबरच महिला दिनासह सर्व राष्ट्रीय दिन जयंती उत्सव साजरा करणे , आदर्श व्यक्तींचा सन्मान करणे आदि निर्णयासह कल्पतरू बचतगटाची वार्षिक सर्वसाधारण सभा दि.२५ फेब्रु. शनिवार रोजी खेळीमेळीच्या वातावरणात तिरंगानगर तरोडा खुर्द येथे संपन्न झाली.सभेच्या अध्यक्षस्थानी सौ.सुनिता वासाटे तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे, जिल्हा परिषद सहशिक्षिका सौ.सविता घुले यांची उपस्थिती होती.प्रारंभी सर्वांनी भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. गटाचे अध्यक्ष तुकाराम सरपे यांनी प्रास्ताविक केले तर सचिव सुरेश मोरे यांनी वार्षिक ताळेबंद सादर केला.सभेस सदस्य सर्वश्री राजेश भगत, अरविंद घुले,प्रभाकर वासाटे,अरुण भरणे, विजय पाटील, सिध्दार्थ कावळे,गितेश पाटील,सदींप राऊत इत्यादी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment