औरंगाबाद :
‘जी २०’ परिषदेसाठी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात येत आहे. शनिवारी आलेल्या १३ पाहुण्यांचे महाराष्ट्रीयन परंपरेने स्वागत करण्यात आले. पाहुण्यांना गळ्यात झेेंडूच्या फुलांचा मोठा हार घालण्यात आला, तसेच प्रत्येकाचे महाराष्ट्राच्या पारंपारिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना पैठणी शाल प्रदान करण्यात आली. झेंडूच्या फुलांच्या हारामुळे पाहुणे हरखून गेले होते. यामुळे परदेशी पाहुण्यांनी हॉटेलमध्ये जाईपर्यंत हार काढलेच नाही. या १३ जणांमध्ये अमेरिका, इंग्लड, तुर्की या देशांतले हे प्रतिनिधी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. रविवारी सकाळी देखील बहुतांश प्रतिनिधी शहरात दाखल झाले आहेत.
चिकलठाणा विमानतळावर ‘जी २०’ परिषदेसाठी शनिवारी (२५ फेब्रुवारी) तीन देशांतून परदेशी पाहुणे विमानतळावर आले. शहरात आयोजित ‘वुमन २०’ बैठकीसाठी नायजेरिया, अमेरिका आणि तुर्की येथून महिला प्रतिनिधी शहरात दाखल झाल्या. हैदराबादहून दुपारी ४.२० वाजता इंडिगोच्या विमानातून इमलॉन टिर्की, पल्लवी पाठक यांचे आगमन चिकलठाणा विमानतळावर आगमन झाले. नवी दिल्ली येथून सायंकाळी ५.१० वाजेच्या इंडिगो विमानाने चार महिला सदस्यांचे विदेशातून आगमन झाले.
No comments:
Post a Comment