प्रसिद्ध उद्योगपती माननीय सी.आर. सांगलीकर अनाथपिंडक पुरस्काराने सन्मानित - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 26 February 2023

प्रसिद्ध उद्योगपती माननीय सी.आर. सांगलीकर अनाथपिंडक पुरस्काराने सन्मानित

पुणे  :-    दि.२५ व २६ फेब्रुवारी २०२३ रोजी रसिकलाल एम धारीवाल संकुल,आळंदी (पुणे) येथे बुद्ध विहार समन्वय समितीने आयोजित केलेले बुद्ध विहारांचे २ रे राष्ट्रीय अधिवेशन सुंदर नियोजनाने पार पडले.या अधिवेशनात माननीय उद्योजक सी.आर.सांगलीकरसाहेब यांनी सांगली जिल्ह्यातील त्यांच्या जन्मगावी गुगवाड येथे स्वतः च्या तब्बल वीस एकर जमीनीमध्ये पंधरा कोटींचे देखणं  प्रशस्त, स्वखर्चाने "धम्मभूमी"  बुद्ध विहार उभारले आहे.गेल्या १२ नोव्हेंबर २०२२ला "धम्मभूमी" चा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांतील अंदाजे दोन लाख धम्मबांधवांच्या उपस्थितीत अतिशय दिमाखात पार पडला आहे. मा.सांगलीकरसाहेब तन, मन,धनाने करत असलेल्या प्रामाणिक धम्म कार्याचा गौरव म्हणून बुद्ध विहार समन्वय समितीने अनाथपिंडक हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे.मा.सांगलीकर साहेब निस्वार्थी पणे धम्म कार्य करत असल्याने कार्यक्रमास विविध भागांतून आलेल्या प्रतिनिधींनी त्यांच्या बरोबर धम्म कार्याबद्दल चर्चा केली.


         बुद्ध विहारांच्या २ -या अधिवेशनाचे मुख्य संयोजक अशोक सरस्वती , मुख्य आयोजक गजानन पडघम तर स्वागताध्यक्ष आचार्य अशोक प्रियदर्शनी होते.तसेच यावेळी गोव्यातील पहिल्या बुद्ध विहारचे डॉ.उल्हास चांदेलकर, नाशिकचे प्रविण गांगुर्डे यांच्या सह विविध ठिकाणचे प्रतिनिधी उपस्थित होते.

  सदर बुद्ध समन्वय समितीमध्ये भारतीय बौद्ध महासभा,समन संघ, बौद्ध विकास महासंघ, बुध्दीस्ट फ्रॕटरनिटी मुव्हमेंट राजस्थान, बौद्ध महा संघ गुजरात, बुद्ध विहार संकलन समिती,समता सैनिक दल, तिबेटीयन बौध्द समाज,नॕशनल को-आॕर्डीनेशन कमिटी आॕफ बुद्धीस्ट आॕर्गनायजेशन(इंडिया) या भारतातील संस्थांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Pages