शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज सादर करण्याचे आवाहन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 27 February 2023

शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज सादर करण्याचे आवाहन

नांदेड :

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या  दोन विभागांतर्गत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविण्यात येते. व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित/ विनाअनुदानित/ कायम विनाअनुदानीत महाविद्यालयातील सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या अनुसुचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन भरावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांनी केले आहे.


 


तसेच आपल्या विद्यालयात त्याची हार्ड कॉपी जमा केलेली आहे परंतु मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे महाविद्यालय स्तरावर अनुसूचित जाती प्रवर्गातील जवळपास 5 हजार 223 शिष्यवृत्ती अर्ज व विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील जवळपास 5 हजार 633 शिष्यवृत्ती अर्ज अद्यापही महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. या कार्यालयामार्फत वेळोवेळी लेखी पत्राद्वारे, प्रेसनोट द्वारे व तोंडी सूचना देऊन अद्यापही महाविद्यालयाकडून यावर कार्यवाही झालेली नाही. ज्या महाविद्यालय स्तरावर शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित आहेत अशा महाविद्यालयांनी अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज 5 मार्च 2023 पर्यंत तपासून पात्र असल्याची खात्री करून तात्काळ सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांचे स्तरावर फॉरवर्ड करावेत. जर एकही मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या महाविद्यालयांचे प्राचार्य यांची राहील, याची नोंद घ्यावी असे समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Pages