सोलापूर :
माता रमाई आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त सोलापुरातील न्यू बुधवार पेठ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आर.एस.मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक रविंद्र सरवदे यांच्या संकल्पनेतून "एक दिवा त्यागाचा" या उपक्रमाअंतर्गत हा दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित सर्व महिलांना फेटे बांधून सन्मान करण्यात आला. यावेळी महिलांनी तब्बल 25 हजार दिवे लावले.
पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे यांच्या हस्ते या दीपोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक रविंद्र सरवदे, शाहूराजे प्रतिष्ठानचे सचिन वाघमारे, सुधाकर गुंडेली, मदन वडावराव, राज्जया गज्जम, आनंद गोरट्याल, बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानचे अजित गादेकर, भिममुद्रा प्रतिष्ठानचे सुजित अवघडे, निखिल कोयले, अमर कांबळे, सोहन लोंढे, रोहित जगताप, विनय रायकर, समीर नदाफ, सागर बाबरे आदी उपस्थित होते.
रोटर मशीनचा वापर करुन स्टॅंन्डच्या सहाय्याने यावेळी दिवे प्रकाशित करण्यात आले होते. सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा असा हा दीपोत्सव साकार करण्यात आला होता. हा दीपोत्सव पाहण्यासाठी शहर आणि जिल्ह्यातील नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस उपायुक्त डॉक्टर दिपाली काळे यांनी माता रमाईच्या कार्याचा गौरव करून या उपक्रमाचे कौतुक केले.
हा दीपोत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येक महिला घरातून मेणबत्त्या घेऊन आल्या होत्या. माता रमाईचे स्मरण करीत त्यांनी ते दिप प्रज्वलित केले. लक्ष दिव्यानी सजलेल्या रांगोळीमध्ये झेंडुच्या फुलांची अनोखी सजावट नयनरम्य अशी दिसत होती. यावेळी उपस्थित सर्व महिलांचा फेटे बांधून सन्मान करण्यात आला.
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष कदम, गुड्डू तळभंडारे, नितीन कांबळे, माँटी बाबरे, अनिकेत तळभंडारे, सोनू इंगळे, श्री. सोमा, अनिकेत जगताप, सौरभ इबतहल्ली, विवेक इंगळे, आदित्य बाबरे, रोहन सोनकांबळे, सोहन सोनकांबळे, सोनू बाबरे, मोनू बाबरे, आयुष जगताप, रोहन कांबळे, नयन जगताप, कनिष्क रणशृंगारे, शुभम इबतहल्ली, विकी सिद्धगणेश आदींनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment