औरंगाबाद :
जळगाव रोड हर्सूल चौक या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांचा पुतळा बसविण्यात यावा या प्रमुख मागणी सह आज औरंगाबाद जिल्हाधिकारी,विभागीय आयुक्त तथा औरंगाबाद महानगर पालिकेचे प्रशासक आयुक्त यांना भेटून निवेदन सादर करण्यात आले,मागील अनेक वर्षांपासून सदरील चौकात बुद्धांचा पुतळा बसविण्यात यावा यासाठी परिवर्तनवादी व आंबेडकरी समूहातर्फे प्रशासनाकडे पाठपुरावा चालू असून आज घडीला जी 20 च्या माध्यमातून जो शहराचा कायापालट होतोय त्यातच सदरील चौकात तथागत गौतम बुद्धांचा पुतळा बसविल्यास त्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होईल कारण जगभरातून आंतरराष्ट्रीय पर्यटक जेव्हा अजिंठा वेरूळ लेण्यांना भेटी देण्यास येतात तेव्हा त्यांना या मार्गानेच जावे लागते,आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट राष्ट्रांकडून जो कोट्यावधींचा निधी आपल्याला प्राप्त होतो तो केवळ अजिंठा वेरूळ लेण्यांमुळेच त्यामुळे जी 20 च्या होऊ घातलेल्या बैठकीपूर्वी सदरील पुतळा बसविण्यात यावा याकरिता आज आंबेडकरी चळवळीतील युवक नेत्यांच्या उपस्थितीत तथा वरीष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
No comments:
Post a Comment