रेल्वे प्रश्नी पूर्णा संघर्ष समितीची नांदेड डी.आर.एम.सोबत सकारात्मक चर्चा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 14 February 2023

रेल्वे प्रश्नी पूर्णा संघर्ष समितीची नांदेड डी.आर.एम.सोबत सकारात्मक चर्चा

पूर्णा:रेल्वेच्या प्रश्नांवर  पूर्णा संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आलेल्या बंदच्या पाश्र्वभूमीवर आज नांदेड रेल्वे विभागाचे व्यवस्थापक ओपिंदरसिंग यांचे कार्यालयात पूर्णा संघर्ष समितीच्या समन्वय समिती सोबत सकारात्मक चर्चा झाली.या प्रसंगी डी.आर. एम.यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आलेल्या प्रत्येक मागणीवर सविस्तर चर्चा झाली.ज्यात त्यांच्याआधिकरात असणाऱ्या मागण्यांची तातडीने  पूर्तता करण्याचे आदेश त्यांनी संबंधित 

आधिकाऱ्याना दिले. पूर्णेतील प्लॅटफॉर्म नंबर एक वर तिकीट मिळण्याची त्वरित व्यवस्था करण्यात येईल.प्लॅटफॉर्म नंबर एक ते चार वर येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्या निश्चित करण्यात येतील. कोणत्याही आवश्यक कारणा शिवाय पूर्नेतील कोणत्याही कर्मचाऱ्यास पूर्णेतून  हलविले जाणार नाही.रेल्वे दवाखान्यातील स्टाफ आणि औषधी यांचे कडे जातीने लक्ष देवू.


सिध्दार्थ नगर ते बुद्ध विहारास जोडणारा पादचारी पूल त्वरित होण्यासाठी न. प. पूर्णा कडे अंदाजपत्रक पाठविले आहे.त्यातील त्यांच्या निधीचा वाटा त्यांनी आमच्याकडे जमा करावा,त्यांनी तो पूल बांधण्याची जबाबदारी घ्यावी.रेल्वे आपला वाटा  न. प.कडे वर्ग करण्यास तयार असल्याचेही रेल्वे व्यवस्थापकांनी चर्चे दरम्यान सांगितले.विशेष गाड्यांच्या नावाखाली तिकीटाची आकारणी जास्त केली जाते,प्रस्तावित इलेक्ट्रिक शेड, डेमू मेन्टेनस शेड,आदि बाबत मी कोणताही निर्णय घेवू शकत नाही.तो दिल्ली रेल्वे बोर्डाचा विषय आणि आधिकर आहे.अशा धोरणात्मक निर्णयांसाठी मा.खासदार,मंत्री महोदय,आदि लोक प्रतिनिधींनी प्रयत्न करावेत.असेही सूचक वक्तव्य त्यांनी केले.


रेल्वे परिसरतील मोडखलीस आलेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करू असेही ते शिष्टमंडळाला सोबत झालेल्या चर्चेत बोलले.राष्ट्रीय सुरक्षा आयुक्त मा. विप्लबदास गुप्ता यांचीही संघर्ष समितीच्या समन्वय समिती ने भेट घेवून रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी वाढविण्याची मागणी केली असता त्यांनी त्याबाबत सकारात्मक चर्चा करून आवश्यक ते सहकार्य करण्याचा शब्द दिला.

     

 पूर्णा संघर्ष समितीच्या समन्वय समितीत रिपाई नेते प्रकाश कांबळे. अब्दुल मुजीब अब्दुल हबीब ,शेख नसीर,डॉ. अजयसिंह ठाकूर,मो. शफीक,प्रदीप ननावरे  आदींचा समावेश होता.

No comments:

Post a Comment

Pages