नांदेड - बेंगलोर येथील जैन विद्यापीठातील एका महाविद्यालयीन गटाने जातीवादी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमानजनक विटंबना (स्कीट) सादर केले आहे. या गोष्टीचा निषेध म्हणून सर्व आंबेडकरी चळवळीतील विद्यार्थ्यांच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे निदर्शने करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे, सम्यक विद्यार्थी आंदोलन चे अभय सोनकांबळे
वं ब यु आ नांदेड दक्षिण महानगरध्यक्ष गोपाल सिंग टाक, महासचिव शुद्धोधन कापसीकर, आकाश जोंधळे, सचिन पवळे, वैभव लष्करे, कश्यप पोवळे, सौरभ पवार, पंकज हटकर, वीरप्रताप सिंग, राम पोवळे, अविनाश बोनाकुडकेवार, यशस पोवळे, विनोद तीगोटे, उद्धव बोयवारे, अमित पोवळे, कबीर थोरात, यशवंत ढगे, सत्यपाल धुताडे तसेच आदी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment