१२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेला सर्वांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे - राजेंद्र शेळके ; रामदास आठवले व चंद्रकांत हंडोरे यांची उपस्थिती - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 2 February 2023

१२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेला सर्वांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे - राजेंद्र शेळके ; रामदास आठवले व चंद्रकांत हंडोरे यांची उपस्थिती

किनवट : महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी जागतिक बौद्ध धम्म परिषद दरवर्षी किनवट येथे आयोजित केली जाते. या वर्षी ची १२ वी जागतिक बौद्ध धम्म परिषद दिनांक ४ व ५ फेब्रुवारी रोजी, बुद्धभुमी परीसर, समतानगर, किनवट येथे आयोजित केली आहे. त्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र शेळके यांनी या कार्यक्रमास सर्वांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सर्व नागरिकांना केले आहे.

         प्रसार माध्यमांशी बोलताना आयोजक राजेंद्र शेळके म्हणाले की, दिनांक ४ व ५ फेब्रुवारी रोजी किनवट येथे होणाऱ्या १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे प्रमुख आकर्षण व मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे, मा. चंद्रकांतजी हंडोरे (माजी सामाजिक न्याय मंत्री, महाराष्ट्र राज्य), मा. रामदासजी आठवले (मा. केंद्रीय सामाजिक राज्य न्यायमंत्री, महाराष्ट्र), रामभाऊ तायडे (राष्ट्रीय अध्यक्ष, दलित पँथर), दिपकजी निकाळजे (आर.पी.आय. राष्ट्रीय अध्यक्ष, आंबेडकर गट), मा. पै. तानाजीभाऊ जाधव, (राष्ट्रीय अध्यक्ष, टायगर ग्रुप), या सर्वांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

         तसेच जापान, थायलंड व श्रीलंका अशा देश विदेशातील भंतेजी यांची धम्मदेसना, तसेच विविध क्षेत्रातील वक्ते व मान्यवरांचे मार्गदर्शन विवीध सत्रामंध्ये सलग दोन दिवस सर्वांना लाभणार आहे आणि सांस्कृतिक संध्या मध्ये, मी होणार सुपरस्टार, टि.व्ही सीरीयल फेम प्रबुद्ध जाधव आणि सुप्रसिद्ध मराठी चित्रपटांतील गायीका रेश्मा सोनवणे यांच्या सह इतर ८ सुप्रसिद्ध गायकांचा आंबेडकरी विद्रोही शाहीरी जलसा होणार आहे.

          तरी या १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेला सर्वांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहुन या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन आयोजक राजेंद्र शेळके, संयोजक निखिल वाघमारे, प्रकाशक सिद्धार्थ वाघमारे, राहुल चौंदते, सुरेश मुनेश्वर, संघपाल कानिंदे, दिनेश कांबळे व सर्व संयोजन समितीने केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages