विदर्भातील काही भागात दिसले स्टारलिंक उपग्रह - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 2 February 2023

विदर्भातील काही भागात दिसले स्टारलिंक उपग्रह

नागपुर  : काल  सायंकाळी 7.00 वा. ते 7.15 वा. च्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातून आकाशातून उपग्रहांची माळ जातांना दिसली. याला स्टार लिंक म्हणतात.


स्टार लिंक हा  स्पेस एक्स द्वारे संचालित इंटरनेट उपग्रहांचा समूह आहे. जो सध्या 47 देशांना उपग्रह इंटरनेट सेवा प्रदान करतो.  स्पेस एक्स  ही ईलाॅन मस्क यांची खाजगी इंटरनेट कंपनी  असून या संस्थेने 2019 मध्ये स्टार लिंक उपग्रह प्रक्षेपित करण्यास सुरुवात केली. डिसेंबर 2022 पर्यंत स्टार लिंक मध्ये पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 3300 पेक्षा जास्त वस्तुमान निर्मित लहान उपग्रहांचा समावेश आहे.


इलाॅन रिव्ह मस्क हा एक 51 वर्षीय कॅनडियन /अमेरिकन व्यावसायिक आहे. हा  टेसला  मोटर्स ह्या अमेरिकन कंपनीचा संस्थापक व मुख्याधिकारी आहे. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी या कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार सांभाळतो.

त्याचे यावर्षी नंतर जागतिक स्तरांवर मोबाईल सेवा देण्याचे उद्दिष्ट आहे.

No comments:

Post a Comment

Pages