कल्याण :
जीवनदीप महाविद्यालयातील मास मीडिया विभागाद्वारे शॉर्ट फिल्म लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चित्रपट अभ्यासक भानुदास पानमंद यांनी शॉर्ट फिल्म लेखन करण्यासाठी महत्वाच्या घटकांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये कथाबीज, कथेचा आरंभ-मध्य-शेवट, स्क्रीनप्लेची मांडणी, कलाकारांची निवड व प्रत्यक्ष चित्रीकरण कसे करावे याविषयी माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत शॉर्ट फिल्म लेखन समजावे यासाठी विविध उदाहरणे देऊन कार्यशाळा आकर्षक व कुतूहल निर्माण करणारी होती. याप्रसंगी चित्रपट अभ्यासक भानुदास पानमंद यांनी विद्यार्थ्यांना जाहिरात व शॉर्ट फिल्म लेखन करण्यास प्रोत्साहित केले. या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना शॉर्ट फिल्म बनविण्यासाठी विविध महत्वाच्या घटकांचा उलगडा होण्यासाठी मार्गदर्शन मिळाले.
यावेळी उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे,विभाग प्रमुख प्रा. डॉ. राहूल तौर, प्रा. रविंद्र वाळकोळी, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment