औरंगाबाद:- बौद्ध लेणी परिसर आणि गोगाबाबा परिसर येथे टीम तरुणाईने ग्रीन व्हॅलेंटईन डे मोठ्या उत्साहात साजरा केला,ही संस्था मागिल सहा वर्षापासून आरोग्य, शिक्षण ,पर्यावरण आणि युवक या क्षेत्रात काम करत आहे. एक चांगला समाज निर्माण करण्यासाठी तरुणांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करत आहे.टीम तरुणाईने या वर्षीपासून "ग्रीन व्हॅलेंटाईन डे" सेलिब्रेट करायचे ठरवले आहे .आपण जे प्रेम माणसांवर करतो . तेच प्रेम आपण पर्यावरणावर करूया .निसर्ग जपुया. आणि याच माध्यमातून आज स्वच्छता मोहीम आयोजित केली होती. आणि याला चांगला प्रतिसादही मिळाला.
निसर्गा विषयी असलेले प्रेम या मोहिमेतून मांडण्याचा टीम तरुणाईने प्रयत्न केला आहे .सकाळी 7 ते 10 या वेळेत बौद्ध लेणी वरील परिसर आणि गोगाबाबा परिसर या ठिकाणी टीम तरुणांच्या माध्यमातून स्वच्छता करण्यात आली. याप्रसंगी तरुणाई चे सदस्य कुणाल पैठणे, शुभम निनावे,वैष्णवी बिडवे,वैभव काकडे,पवन शेळके आणि अनुजा क्षीरसागर यांच्या पुढाकारातून आजच्या ग्रीन व्हॅलेंटाईन या निसर्ग संवर्धनाच्या उपक्रमाची सुरुवात झाली.निमिष लोहाळे आणि गणेश शिंदे याची प्रमुख उपस्थिती होती.
रविभाऊ शेळके यांच्या सहकार्यातून गौरव शेळके व तेजस कोरडे यांनी कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली. यावेळी मोठ्या संख्येने पर्यारणप्रेमी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment