किनवट, दि.13 : कॉस्मॉपॉलिटन विद्यालय किनवट येथे गुरूवार (दि.09) रोजी ‘जागरूक पालक सुदृढ बालक’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, वैद्यकीय अधीक्षक मनोज घडसिंग, वैद्यकीय अधिकारी डॉ.ओहळ, पर्यवेक्षक आर.आर. बारापात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व आरोग्य विभाग जि.प नांदेड अंतर्गत ह्या अभियानाचा शुभारंभ कॉस्मापॉलिटन विद्यालय किनवट येथून करण्यात आला. या अभियानांतर्गत राज्यातील सर्व 0 ते 18 वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, प्रयोगशाळा तपासण्या व आवश्यकतेनुसार उपचार,शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे कार्यक्रमाचे मार्गदर्शक वैद्यकीय अधिकारी ए. एम.ओहळ यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व शासकीय - निमशासकीय शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आश्रम शाळा, दिव्यांग शाळा, अंगणवाड्या, बालवाड्या, बाल सुधारक, अनाथालय, समाज कल्याण व आदिवासी विभाग वसतीगृह, खाजगी शाळेतील मुला - मुलींची आरोग्य तपासणी करायची असून. यावेळी आजारी आढळून आलेल्या बालकांवर त्वरित उपचार व संदर्भ सेवा पुरवण्यात येणार असल्याचे डॉ. मृणाल जाधव यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बाळकृष्ण कदम यांनी केले. या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे, खा.हेमंत पाटील यांचे पीआरओ सुनिल गरड, माजी उपसभापती गजानन कोल्हे, डॉ. संतोष गुंटापेल्लीवार, डॉ. गोणेवार, डॉ. शिवशंकर केंद्रे, संस्थेचे सचिव पी. व्ही. रामतिर्थकर, अध्यक्ष एन.व्ही. रामतीर्थकर, मुख्याध्यापक व्ही.एस.मोहिते, सुरज सातुरवार, मारुती सुंकलवाड, डॉ. अरटवाड, घनश्याम कराळे, गुरुणुले, बोंबले, सुनील येरेकार, कपिल रेड्डी, अजय कदम, शाळेचे सहशिक्षक के.जी.जाधव, व्ही.एम. पुराणिक, संजय गरुडे, एस.बी. गज्जलवार, जे.पी.जोशी, ए.व्ही. खडसे, व्ही.डी. देशपांडे, एम.जे.देशमुख, अगरमोरे सर, कयापाक सर, एल. यु. वाडगुरे. राजू बोलेनवार, ए. एम. चनमनवार, ए.बी.बेलखेडे, संदीप गायकवाड यांचेसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment