विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी प्रभावी शिक्षण प्रणाली विकसित करणार - नवनिर्वाचित कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे प्रतिपादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 13 February 2023

विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी प्रभावी शिक्षण प्रणाली विकसित करणार - नवनिर्वाचित कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे प्रतिपादन

ठाणे :

जीवनदीप महाविद्यालयात नुकताच दैनिक जीवनदीप शिक्षकरत्न पुरस्कार – २०२३ व आदर्श शैक्षणिक संस्था पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी नवनिर्वाचित कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षण व्यवस्थेतील बारकावे आणि बदलांविषयी उपस्थित शिक्षकांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत बदल करून प्रभावी शिक्षण व्यवस्था तयार करण्याचा मानस असल्याचे सांगितले.  


याप्रसंगी ठाणे जीवनदीप वार्ताचे मुख्य संपादक रविंद्र घोडविंदे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  शैक्षणिक संस्था आणि शिक्षक यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गेल्या दोन वर्षापासून शिक्षण क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या संस्था व शिक्षकांना दैनिक ठाणे जीवनदीप वार्ताकडून पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे.


यावर्षी शिक्षकरत्न पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले होते. पुरस्कारासाठी शंभरहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील २३ शिक्षकांची शिक्षकरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यामध्ये सिद्धप्पा लक्ष्मण शिंदे, प्रमिला संतोष पवार, शलाका सुधांशु नागवेकर, अर्जुन धाकू माचिवले, रामराव शिवलाल पवार, आडेप दत्तात्रय किसनराव, दिप्ती दिलीप यादव, ज्योती किरण सानये, ललिता बाळू मोरे, दत्ता संभाजी लोणारे, वैशाली प्रकाश रोहणे, सुप्रिया प्रकाश नायकर, वैभवी स्वानंद तरटे, अर्चना अरविंद मोहिते, कल्पेश मनोहर शिंदे, रतिलाल रामचंद्रजी बाबेल, दिनानाथ मुरलीधर पाटील, यशवंत मधुकर महाजन, सुभाष यादव सरोदे,प्रशांत तुकाराम माळी, आनंद किशोर मेहेर, हेमंत झुंझारराव, अजय रामराव जिरापुरे यांना शिक्षकरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.


तसेच आदर्श शैक्षणिक संस्था पुरस्कारासाठी अब्दुल कादिर जुवारी एज्युकेशन ट्रस्ट वाहोली, श्री गावदेवी शिक्षण संस्था खडवली, संभाजीराव देशमुख शिक्षण संस्था गुरवली, मराळेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ म्हारळ, पंढरीनाथ धाऊ मगर मित्र मंडळ घोटसई, शिवनिकेतन ट्रस्ट खडवली, ग्रामविकास विकास मंडळ अंताडे, सप्तश्रृंगी शिक्षण प्रसारक मंडळ अटाळी, श्री विघ्नहर शिक्षण प्रसारक मंडळ मोहने, दादोजी कोंडदेव शिक्षण प्रसारक मंडळ निंबवली, रेशमाई शिक्षण प्रसारक मंडळ मांडा टिटवाळा, श्री बाळेश्‍वर विद्या प्रसारक मंडळ मांडा टिटवाळा, सेक्रेड हार्ट स्कूल वरप, शिक्षण विकास मंडळ टिटवाळा, श्रीकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळ काकडपाडा, गणेश शिक्षण प्रसारक मंडळ टिटवाळा, विद्या विकास मंडळ वाशिंद, शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटी शहापूर, उपेक्षित जनता सेवा संघ उल्हासनगर, आद्य क्रांतिवीर शैक्षणिक संस्था नवीन पनवेल, कै.भास्करराव महाजन सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतीक संस्था इंदाला, समूह श्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ - भिवंडी, अण्णासाहेब सिंधू एज्युकेशन सोसायटी उल्हासनगर, कल्याण होलसेल मर्चंटस एज्युकेशन सोसायटी कल्याण, जीवन विकास शिक्षण संस्था पालघर, स्वामी विवेकानंद संस्था पाली, पेण एज्युकेशन सोसायटी पेण, बेथनी आश्रम ट्रस्ट रुंदे या शैक्षणिक संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश टेंभे यांनी केले.


या पुरस्कार सोहळ्याला आ.किसन कथोरे, आ. निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे, उपनेते प्रकाश पाटील, मा.आ. नरेंद्र पवार, उद्योजक मंगेश बनकरी, संचालिका स्मिता घोडविंदे, संचालक प्रशांत घोडविंदे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश रोहणे,  संस्थाचालक व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages