काँग्रेस अनुसूचित जाती विभाग नांदेड शहर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मंगेश कदम यांचा सिडको येथे नागरी सत्कार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 28 February 2023

काँग्रेस अनुसूचित जाती विभाग नांदेड शहर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मंगेश कदम यांचा सिडको येथे नागरी सत्कार

जयवर्धन भोसीकर  

       नवीन नांदेड ःसिडको संतकबीर नगर येथील चंद्रमुनी बुद्ध विहार कमिटी तर्फे तसेच काँग्रेस महिला कमिटी विभाग सिडको व युवा कार्यकर्ते यांच्यातर्फे मंगेश कदम यांची नांदेड शहर जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार  ढोल ताशाच्या गजरात आतिषबाजी करून करण्यात आला या सत्काराला सिडको हाडकोतील युवा पिढी, ज्येष्ठ नागरिक तसेच महिलां मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या . त्याप्रसंगी काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष मंगेश कदम यांनी बेरोजगार तुरुणांना महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे, संत रविदास, खादी ग्रामोद्योग जिल्हा उद्योग केंद्र यांच्यामार्फत  आपले उदयोग उभारावे  व महिलांना गृह उद्योग उभारण्यासाठी पण सहकार्य करणार असल्याचे  आव्हान केले या वेळी विहाराचे अध्यक्ष इंजिनियर निखिल कागडे, शेख हुसेन काँग्रेस कमिटी शहर जिल्हा सरचिटणीस,  राहुल थोरात ,सोपान सोनसळे, शामरावजी कांबळे, केरबा लांडगे, बंटी कोकरे मित्र मंडळ, बालाजी हटकर ,प्रकाश पाटावकर, राजरत्न काकडे, रजत पंडीत, यशवंत कांबळे, अनिकेत हनुमंते, व समस्त जय भवानी नगर व समस्त संत कबीर नगर महिला असंख्य युवा कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages