नांदेड:
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षात सिंहाचा वाटा उचलणारी, बाबासाहेबांना त्यांच्या स्वप्नात सहकार्य करणारी त्यांची सहचारिणी रमाई आंबेडकर यांच्या रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्त्रियांनी स्वतःला सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असा संदेश यावेळी देण्यात आला. परिसरातील नवोदित विद्यार्थी वक्त्यांनी माता रमाईचा त्याग आणि संघर्षांबद्दल आपलं मत व्यक्त करून त्यांना अभिवादन केले. यावेळी हनुमंते बाई, वाटोरे बाई, सरपाते बाई, गच्चे बाई, पंडित बाई, काशीदे बाई, बगाते बाई, शंकर निवडंगे, गोवंदे सर, दुधमल सर, श्रीपती ढोले सर, इंगोले सर, उन्मेश ढवळे, विजय बगाते , दीपक काशीदे, राजू ढगे, शेळके, संदीप वाटोरे, दास निखाते, सह अन्य बौद्ध उपासक आणि उपासिका उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रभात नगर मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था आणि धम्माश्रय युवा विचार मंच यांनी कष्ट घेतले.
No comments:
Post a Comment