औरंगाबाद :
रत्नागिरी जिल्हातील महानगर टाईम्सचे राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या दुचाकीला धडक देऊन त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने जिल्हाधकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. अतिरिक्त जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी यावेळी निवेदन स्वीकारले.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव बालाजी सुर्यवंशी म्हणाले की, पत्रकार शशिकांत वारिशे यांनी ज्यांच्या विरोधात बातमी प्रसिद्ध केली ते कारचालक पंढरीनाथ आंबेकर होते, त्या सकाळी पंढरीनाथ आंबेरकर यांच्या विरोधात बातमी लागते आणि त्याच व्यक्तीची कार वारीसे यांच्या गाडीला जोरदार धडक देते, त्यात वारिशे यांचा दुर्दैवी म्रूत्यू होतो हा केवळ योगायोग नसून कट रचून केलेला हा खून आहे. या घटनेचा आम्ही राज्यातील सर्व पत्रकार तीव्र निषेध करतो, तसेच आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा तसेच फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत पुढील कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे केली.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनिलचंद्र वाघमारे, जिल्हा सचिव कानीफ अन्नपूर्णे, उपाध्यक्ष महादेव जामनिक, ज्येष्ठ पत्रकार डाॅ. अब्दुल कदीर, राजू कांबळे, संजय व्यापारी, जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचे उपाध्यक्ष सावेश जाधव, संघटक सुभाष पाटोळे, प्रसिद्धी प्रमुख सचिन अंभोरे, सुजीत ताजने, साजेद खान, विजय हिवराळे, बबन सोनवणे, देविदास कोळेकर, विजय हिवराळे, अन्वर अलमनुर जाफर, मोहम्मद कलिमोद्दिन, यासह सर्व पत्रकार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment