सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेतर्फे रमाई जयंती उत्साहात संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 10 February 2023

सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेतर्फे रमाई जयंती उत्साहात संपन्न

नागपुर :

 आपल्या लाखो शोषित, पीडित बांधवांसाठी चंदनासारखे झिजणाऱ्या बाबासाहेबांचे आपल्याच कुटुंबाकडे मात्र दुर्लक्ष झाले. मात्र, घरात अठराविश्वे दारिद्र्य असताना कधी गोवऱ्या विकून, कधी लाकडे विकून कुटुंबाच्या विवंचनेची झळ महामानवाच्या कार्याला बसू न देणारी त्यांची पत्नी रमाई बाबासाहेबांची सावली होती. माता रमाईच्या त्यागाचे गुणगाण करताना 'कोटी कोटी लेकरांची आई, माझी रमाई...' या गीतातून समाजाची भावना व्यक्त होते.


प्रियदर्शी सम्राट बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कुकडे -आउट येथे दोन दिवस त्यागमूर्ती रमाई जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमात समाज कल्याणचे उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड ओमप्रकाश राहाटे, क्रांती राहाटे, शिक्षण उपसंचालक विभागाचे अधीक्षक रवींद्र पाटील, प्रीतम बुलकुंडे, राजाभाऊ टांकसाळे, शामल खोब्रागडे, सुकेशनी लोखंडे उपस्थित होते. यानंतर प्रबोधनकार गायक प्रकाशनाथ पाटणकर व परमानंद भारती यांच्या भीम गीतगायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 तरखीला 3 जोडी चे समोहीक विवाह करण्यात आले

सामूहिक विवाह सोहळा आयोजि करण्यात आला. आयोजनात संस्थे अनिकेत कुत्तरमारे, सिद्धार्थ बन्सोड सिद्धांत पाटील, शुभम दामले, वैशाली घुटके, शुभम गडलिंग, श्रीकांत फुले, प्रशिक वाहाने, आदित्य सोनुले, यश कुंभारे, गौरव बुरबुरे, कुणाल महातो, जितेंद्र नारनवरे, पिंकी कांबळे, स्वाती पाटील, लीना कांबळे, सिद्धांत पाटील, ध्ममा दहिवले आदींचा

No comments:

Post a Comment

Pages