रमाईच्या त्यागाने बाबासाहेबांना बळ दिले ; अभिवादन प्रसंगी आंबेडकरी समूहाच्या भावना - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 7 February 2023

रमाईच्या त्यागाने बाबासाहेबांना बळ दिले ; अभिवादन प्रसंगी आंबेडकरी समूहाच्या भावना

औरंगाबाद:

रमाईच्या त्यागाने बाबासाहेबांना उच्चशिक्षणासाठी बळ दिले रमाईच्या कष्टांचे बाबासाहेबांना सतत स्मरण व्हायचे अन बाबासाहेब जिद्दीने सर्व प्रश्नांचा सामना करायचे बाबासाहेबांच्या क्रांतीलढ्यामागे रमाईचा त्याग असल्याच्या भावना त्यागमूर्ती माता रामाई भीमराव आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी १२५ जयंती निमित्त भडकलगेट येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात आंबेडकरी समूहाने व्यक्त केल्या.

यावेळी पंचशील ध्वजारोहण करण्यात येऊन सर्वांनी सामूहिक त्रिसरण पंचशील ग्रहण केले.

व जल्लोषात रमाई आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.



श्रावण गायकवाड,सचिन निकम,विलास जगताप आदींनी अभिवादन पर मनोगत व्यक्त केले.

यावेळी श्रावनदादा गायकवाड, विलास जगताप सीमाताई जगताप,गुल्लू वाकेकर,आयोजक सचिन निकम,मेघानंद जाधव,डॉ.संदिप जाधव,राहुल वडमारे,गुणरत्न सोनवणे,कुणाल भालेराव,पवन पवार, कुणाल राऊत,मनीष नरवडे,संदिप अहिरे,दिनेश गवळे,दिपक जाधव,महेंद्र तांबे,विश्वजित गायकवाड,प्रशांत बोराडे,भीमराव वाघमारे,संदिप तुपसमुद्रे,रामराव नरवडे,अमोल भालेराव,योगेश सोनवणे,अनमोल लिहणार,संजय व्यवहारे, प्रेम सातपुते,शफी बेग, संदिप ढेपे,प्रितेश गायकवाड, रवींद्र खोतकर,रामलिंग कांबळे,आनंद अवचार,आदर्श आमराव,ऋषिकेश तुपारे, आदींसह विविध आंबेडकरी पक्ष संघटनेचे पदाधिकारी व पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे आजी माजी विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रिपब्लिकन विद्यार्थी सेना व मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

No comments:

Post a Comment

Pages