किनवट,दि.१४ : मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड.पुरुषोत्तम खेडेकर, प्रदेशाध्यक्ष इंजि.विजय घोगरे व कार्याध्यक्ष विजय तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा सेवा संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष नानाराव कल्याणकर, जिल्हा सचिव सतीशकुमार जाधव यांच्या स्वाक्षरीने तालुका अध्यक्षपदी प्रा.दगडू भरकड यांची बिनविरोध निवड करून मराठा सेवा संघाचे मावळते तालुकाध्यक्ष डॉ.प्रसाद सुर्वे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मराठा सेवा संघाचे प्रा.जयवंत चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष राजु शिंदे, माजी तालुकाध्यक्ष प्रा.उमाकांत इंगोले, प्रा.शिवदास बोकडे,बापूसाहेब तुप्पेकर,ज्ञानेश्वर कदम,जनार्धन काकडे,बबन वानखेडे,राजेश कदम, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालाजी पाटील सिरसाट यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
नवनियुक्त तालुकाध्यक्ष प्रा.दगडू भरकड यांचे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड सह तालुका व जिल्ह्यातून सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment