शालेय राज्यस्तरीय कराटे क्रीडा स्पर्धेत किनवट येथील विद्यार्थ्यांचे यश - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 16 February 2023

शालेय राज्यस्तरीय कराटे क्रीडा स्पर्धेत किनवट येथील विद्यार्थ्यांचे यश

 


किनवट :

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आणि महाराष्ट्र कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरिय शालेय कराटे स्पर्धा दिनांक . 13 ते 16 फेब्रुवारी 2023 रोजी बारामती येथे संपन्न झाल्या या स्पर्धे मध्ये 14 वर्षाखालील वैष्णवी बेंद्रे तृतीय क्रमांक (कास्यपदक) मिळवून यश प्राप्त केले आहे 17 वर्षाखालील आर्यन मोहरे तृतीय क्रमांक मिळवून यश प्राप्त केले आहे 17 वर्षाखालील संचिता वाडगुरे तृतीय क्रमांक (कास्यपदक )मिळवून यश प्राप्त केले आहे  19 वर्षाखालिल शिवणी पतंगे  तृतिय क्रमाक ( कास्य पदक ) मिळवून यश प्राप्त केले . या विजयी स्पर्धकाचे सर्व स्तरातून  अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .सदरील चार विद्यार्थी मुख्यप्रशिक्षक संदीप येशीमोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत  आहेत.

No comments:

Post a Comment

Pages