किनवट,दि.९ : शहर व परिसरात तथाकथित पत्रकारांनी हैहोस घातला आहे, यामुळे अधिकारी, कर्मचारी,गुत्तेदार,नागरिक, संस्था चालक व व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे.
पीत पत्रकारिता करणा-या अनेक पत्रकारांवर खंडणी सह अनेक गुन्हे पोलिस ठाण्यात नोंद झालेले आहेत.परंतु,ते आपली गुन्हेगारी पार्श्वभूमी लपविण्यासाठी पत्रकार संघटनेचा व पैसे देऊन विकत आणलेल्या ओळख पत्राचा आधार घेतात व आपल्या कुटुंबाचा आरामात उदरनिर्वाह चालवतात.उदाहरणा दाखल सांगावयाचे झाल्यास एका पत्रकाराने शहरानजिक असलेल्या घोटी गावच्या मुख्याध्यापकांकडे खंडणी मागितली होती. तेंव्हा त्यावेळी मुख्याध्यापकाच्या फिर्यादीवरून त्या तथाकथित पत्रकारावर खंडणीचा गुन्हा ही दाखल झाला होता.आता तोच पत्रकार हा एका पत्रकार संघटनेचा सचिव होऊन पोलिस कर्मचाऱ्यांसह अन्य कर्मचारीही व अधिका-यांसोबत मानाने मिरवत आहे.
तथाकथित पत्रकारांना बातमी म्हणजे काय व ती कशी लिहावी याचे साधे ज्ञान सुध्दा नाही,अशा पोटभरू पत्रकारांची पोलिस विभागाने व माहिती व जनसंपर्क विभागाने चौकशी करून अशा पत्रकारांना आवर घालावा,अशी मागणी नोंदणीकृत असलेल्या किनवट तालुका पत्रकार संघाचे संस्थापक सचिव प्रत्रकार अॅड.मिलिंद सर्पे यांनी सर्व संबंधितांकडे केली आहे.
No comments:
Post a Comment