नांदेड, दि.९ (प्रतिनिधी) :
मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष म्हणून नांदेड येथील सामनाचे जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी (नांदेड) यांची फेरनियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी आज केली आहे.
रत्नागिरीच्या जान्हवी पाटील यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच सांगलीचे शिवराज काटकर यांचीही उपाध्यक्ष म्हणून फेर नियुक्ती केली जात आहे.
नांदेडचे प्रकाश कांबळे यांच्यावर लातूर विभाग संघटक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे शरद पाबळे यांनी स्पष्ट केले आहे. पुढील दोन वर्षांसाठी या नियुक्तया असतील. उर्वरित नियुक्तया लवकरच जाहीर करण्यात येतील असे पाबळे यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment