बार्टीच्या आश्वासनानंतर संशोधक विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे संशोधन विद्यार्थ्यांना न्याय देऊ - मा. सुनिल वारे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 14 March 2023

बार्टीच्या आश्वासनानंतर संशोधक विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे संशोधन विद्यार्थ्यांना न्याय देऊ - मा. सुनिल वारे

पुणे  : 

BANRF - २०१८ करिता पीएच.डी २१४ संशोधक विद्यार्थ्यांनी UGC & NFSC च्या मार्गदर्शक तत्वानुसार पीएच.डी करिता पाच वर्ष कालावधीपर्यंत अधिछात्रवृत्ती फिलोशिप देण्याची मागणी संशोधक विद्यार्थ्यांनी बार्टी संस्थेकडे केली. त्या अनुषंगाने दिनांक ०६ मार्च, २०२३ रोजी पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे कार्यालय समोर आमरण उपोषणाकरिता विद्यार्थी उपोषणास बसलेले होते. सदर उपोषणकर्त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने बार्टी संस्थेचे महासंचालक मा. सुनिल वारे यांनी आज दिनांक १० मार्च, २०२३ रोजी उपोषणकर्ते श्री सिद्धनाथ गाडे व श्रीमती संघप्रिया मानव तसेच इतर संशोधक विद्यार्थी यांनी केलेल्या मागणीनुसार सकारात्मक निर्णय घेऊन पीएच.डी च्या २१४ संशोधक विद्यार्थ्यांचा प्रलंबित असलेला निर्णय मार्गी लावण्याचे आश्वासन मा. महासंचालक श्री. सुनिल वारे यांनी संशोधक विद्यार्थ्यांना दिले आहे. तसेच संशोधन विद्यार्थ्यांच्या मागणीच्या अनुषंगाने बार्टीच्या वतीने आम्ही  आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी शासन स्तरावरून  मंजुरी मिळवण्याकरता प्रयत्न करू व  विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळण्याकरिता नियामक  मंडळासमोर विषय मांडून तो  मार्गी लावण्याचे आश्वासन संशोधक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळास व संशोधक विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून  मा महासंचालक यांनी यावेळी दिले.

 त्यामुळे मागील ५ दिवसापासूनचे आमरण उपोषण संशोधक विद्यार्थ्यांनी  मा महासंचालक सर  यांच्या आश्वासनानंतर   मागे घेतले.


  बार्टी संस्थेच्या निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार, योजना विभागाच्या विभागप्रमुख  श्रीमती स्नेहल भोसले ,  विस्तार व सेवा विभागाचे विभागप्रमुख डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण   प्रकल्प व्यवस्थापक श्रीमती शुभांगी सुतार, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक डॉ अंकुश गायकवाड, श्रीमती नसरिम तांबोळी, प्रकल्प अधिकारी संजिव कटके, समाधान दुधाळ यांच्यासह  फेलोशिप विभागातील व बार्टीतील  अधिकारी  व संशोधन  विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages