संभाजीनगर :
दि.१३ पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने भीमजयंती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या नागसेन फेस्टिव्हल च्या नियोजनाची बैठक पी इ एस तंत्रनिकेतन महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाली.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विविध उपक्रमाच्या माध्यमातून हा महोत्सव साजरा करण्यात येणार असून शुक्रवार दि.३१ मार्च,शनिवार दि.१ एप्रिल, रविवार दि.२ एप्रिल रोजी नागसेनवनातील लुम्बीनी उद्यान येथे ह्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय स्थरावरील आंबेडकरी विद्यार्थी कार्यकर्त्यांची 1 दिवसीय परिषद,मिलिंद चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, 'फोटो अँड रिल्स ऑन नागसेनवन' ही समाजमाध्यमावर सक्रिय असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची आगळीवेगळी स्पर्धा ह्या वेळचे प्रमुख आकर्षण असणार आहेत सोबतच माझे नागसेनवन-माझे शिक्षण ही निबंध स्पर्धा देखील घेण्यात येणार आहे.
' मिलिंद व्हाईस ' जिल्हास्तरीय भीमगित स्पर्धेचे आयोजन यंदा प्रथमच करण्यात आले आहे.
विजेत्यांना आकर्षक बक्षिसेही देण्यात येणार आहेत.
तीन दिवसीय महोत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा मिलिंद सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल तसेच पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माजी विद्यार्थ्यास देण्यात येणारा मनाचा ' नागसेन गौरव पुरस्कार ' देखील देण्यात येणार असून यासाठी निवड समिती देखील गठीत करण्यात आली आहे.
विविध विषयांवरील व्याख्यान,चर्चा सत्र,कवी-गझल संमेलन,मूर्तीकला- चित्रकलेची प्रात्यक्षिक-प्रदर्शन,रॅप व भीमगीतांची रेलचेल महोत्सवात असणार आहे.
महोत्सवात मोठ्या संख्येने आजी माजी विद्यार्थी व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सचिन निकम,ऍड. हेमंत मोरे, डॉ.किशोर वाघ, मेघानंद जाधव, अविनाश कांबळे, ऍड.सुनील मगरे ,कुणाल भालेराव , आनंद सूर्यवंशी, प्रा.प्रबोधन बनसोडे,डॉ.अविनाश सोनवणे,गुणरत्न सोनवणे,रुपराव खंदारे,सचिन खाजेकर,स्वप्नील जगताप,विश्वजित गायकवाड, सनी देहाडे,ऍड.तुषार अवचार,सागर ठाकूर,चिरंजीव मनवर,सचिन गायकवाड, आकाश अढागळे यांनी मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने केले आहे.
No comments:
Post a Comment