नांदेड : जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जळगाव येथे अत्यंत आव्हानत्मक काळात तेथील जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी सांभाळून जलसंधारण व सिंचन क्षेत्रासाठी लोकसहभागातून अपूर्व ठसा उमटवीत उल्लेखनीय काम केले. त्यांच्या या सकारात्मक लोकसहभागाला चालना दिलेल्या कार्याचा भारत सरकारच्या जल मंत्रालयाच्या वतीने जलप्रहरी पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.
याचबरोबर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उध्दव भोसले यांनाही हा जलप्रहरी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जल शक्ति मंत्रालय व सरकारटेल डॉट कॉमच्या वतीने प्रतिवर्षी जलसिंचन क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींचा गौरव जलप्रहरी पुरस्कार देऊन करण्यात येतो. यावर्षी देण्यात येणारा जलप्रहरी पुरस्कार जिल्हाधिकारी अभिजित राऊत व कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांना घोषित करण्यात आला आहे. हा पुरस्कार 29 मार्च रोजी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन हॉल येथे केंद्रिय जल शक्ति मंत्री गजेंद्र सिंह शेखावत व केंद्रिय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.
No comments:
Post a Comment