गणेशपूर येथे ‘नाफेड’द्वारा चणा खरेदीचा शुभारंभ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 17 March 2023

गणेशपूर येथे ‘नाफेड’द्वारा चणा खरेदीचा शुभारंभ

किनवट,दि.16 (प्रतिनिधी) : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सन्‌ 2022-23 हंगामासाठी नाफेड (भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ) द्वारे किनवट तालुका कृषी प्रक्रिया सहकारी संस्था गणेशपूर येथे  मंगळवारी (दि.14) सकाळी 11.30 वाजता हरभरा(चणा) खरेदीचा शुभारंभ झाला.


     दरम्यान, कमठाळ्याचे उपसरपंच बालाजी भरकड यांचे हस्ते काटापूजन झाल्यानंतर, गणेशपूरचे रहिवासी मारोती सुरोशे यांच्या हस्ते पोतापूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा मार्केटिंग अधिकारी, संस्थेचे चेअरमन रवी गोविंदराव तिरमनवार, अशोक चव्हाण,  शिवाजी फटाडे,उमाजी चव्हाण,शेषराव मुढेकर,वसंत भोसले, बाबाराव केंद्रे यांचेसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.


     चालू हंगामासाठी चण्याचा हमीभाव प्रति क्किंटल 5 हजार 335 रुपये असून, कृषी विभागामार्फत उत्पादकतेनुसार  15 क्विंटल प्रति हेक्टर प्रमाणे हरभरा खरेदी सुरू आहे. नोंदणी केलेल्या  शेतकर्‍यांना चणा विक्रीला घेऊन येण्यासाठी एसएमएस केल्या गेला होता. त्याप्रमाणे त्यांनी आणलेला एकूण 84 क्विंटल चणा (हरभरा) शुभारंभाच्या वेळी खरेदी केल्या गेला. आतापर्यंत एकूण 12 शेतकऱ्यांचे जवळपास 200 क्विंटल चणा खरेदी केला गेला आहे. खरेदी केंद्रावर हरभरा आणतांना तो चांगल्या प्रकारे वाळवून, चाळणी करून एफ.ए.क्यू. प्रतीचा आणणे आवश्यक असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

Pages