देगलूर :
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फुले नगर येथे भीम जन्मोत्सव साजरा करण्यासाठी नियोजन बैठक पार पडली दरवर्षी फक्त भीम जन्मोत्सव साजरा होत असे पण यावर्षी दि.13 एप्रिल रोजी महात्मा फुले जयंती त्या अनुषंगाने व्याख्यान तथा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम व 14 रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याचे ठरवण्यात आले आहे...सदरील बैठकीमध्ये सर्वानुमते अध्यक्ष म्हणून प्रतीक गंगाधरराव वाघमारे उपाध्यक्ष देविदास गंगाराम ढवळे सचिव प्रतीक यादवराव कांबळे व कोषाध्यक्ष म्हणून संदीप गणेशराव दांडेकर सहसचिव आदित्य वाघमारे सल्लागार शुभम ढवळे व संघटक प्रशांत रमेश गोपाळवाड व मार्गदर्शक म्हणून नंदकिशोर बिल्लाळीकर, आदिनाथ डोपेवाड,प्रेमकुमार गायकवाड यांची निवड करण्यात आली.
No comments:
Post a Comment