जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी तातडीने पंचनामे करण्याचे दिले निर्देश - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 17 March 2023

जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी तातडीने पंचनामे करण्याचे दिले निर्देश

औरंगाबाद, दि. २७ : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी आज जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी करून तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. जे कर्मचारी संपावर आहेत त्यांच्या जागेवर पर्यायी कर्मचारी देऊन पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी अधिकाऱ्यांना दिले. 


जिल्ह्यातील काही भागात ६,७,१६ आणि १७ मार्च रोजी अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारी, मोसंबी, डाळींब तसेच भाजीपाला पिकाचे नुकसान झाले.  या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज या भागाचा दौरा केला. त्यांनी शेकट्या जवळील वाहेगाव देमणी या भागात जाऊन बळवंत तांगडे या बळीराजाच्या शेतात जाऊन पिकाची पाहणी केली. 


यावेळी उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश देशमुख, तहसीलदार ज्योती पवार, अपर तहसीलदार विजय चव्हाण यांच्यासह जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

Pages