नांदेड दि.१८-महाराष्ट्र शासनाच्या ग्रह विभाग २५ फेब्रुवारी २०१५च्या शासन अधिसुचनेनुसार नांदेड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णा भाऊ साठे या थोरांच्या पुतळ्याजवळील दारूची बिअरबार्स त्वरित स्थलांतरित करावीत यासाठी बहुजन समाज पक्षाने साखळी उपोषणाला १५ मार्च २०२३ पासून सुरुवात केली आहे.
या पक्षाने १५ मार्च रोजी मोठे निदर्शने करीत रेल्वे स्टेशन जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याजवळ साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.तत्पर्वी पक्षाने जिल्हाधिकारी नांदेड, अधीक्षक दारुबंदी उत्पादन शुल्क नांदेड यांना लेखी निवेदन सादर केले आहे.
पुतळ्याजवळील बिअरबार्स इतरत्र स्थलांतरित करे पर्यंत साखळी उपोषण आणि निदर्शने सुरूच राहील असे बसपा राज्यप्रभारी मनीष कावळे यांनी सांगितले.स्थलांतरासाठी १४ एप्रिल २०२३ अशी कालमर्यादा बहुजन समाज पक्षाने जिल्हा प्रशासनास लेखी निवेदनात दिली असल्याचे मनीष कावळे म्हणाले.
No comments:
Post a Comment