मुंबई :
राज्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी असलेली जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याने गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येईल असं आश्वासन सरकारने दिलं असल्याचं संपातील समन्वय समितीकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आजपासून हा संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
राज्यातील अवकाळीमुळे जी कामं प्रलंबित आहेत ती पूर्ण करण्यासाठी प्राधान्यानं काम करणार असल्याचं समन्वय समितीने सांगितलं आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी उद्यापासून कामावर हजर रहावं असं आवाहन करण्यात आलं आहे.
No comments:
Post a Comment