गणेश मंझा यांची फसवेगिरी उघड, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदावरून हटवले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 24 March 2023

गणेश मंझा यांची फसवेगिरी उघड, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदावरून हटवले

संभाजीनगर :

शिक्षकेत्तर कर्मचारी संवर्गात मूळ नियुक्ती असून फसवेगिरीकरून शिक्षक संवर्गाची वेतनश्रेणी लाटून शासकीय तिजोरीवर डल्ला मारणारे डॉ. गणेश मंझा यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदावरून हटवण्यात आले आहे. आता संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख प्रोफेसर डॉ. भारती गवळी यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी फसवेगिरी करून शासकीय तिजोरीची लूट केल्याचा मोठा घोटाळा समोर आला आहे. विद्यापीठाच्या सेवेत उपकुलसचिव या शिक्षकेत्तर पदावर नियुक्ती झालेले डॉ.गणेश मंझा यांनी ‘फसवेगिरी’ करून शिक्षक संवर्गाची वेतन श्रेणी लागू करून घेत शासकीय तिजोरीची लूट केली आणि नियमानुसार दरमहा ३९ हजार ५८० रुपये वेतन देय असताना तब्बल २ लाख ४८ हजार ६७३ रुपये वेतन उचलत असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती.


औरंगाबाद विभागाच्या उच्च शिक्षण सहसंचालकांनी त्यांची सुधारित वेतनश्रेणी निश्चित केली असून डॉ. गणेश मंझा यांनी आजवर उचललेले अधिकचे वेतन तातडीने शासन खाती जमा करण्याचे आदेश दिले आहेत. सहसंचालकांचा या आदेशानंतर डॉ. मंझा यांना नियमानुसार वेतन देण्याची कार्यवाही विद्यापीठ प्रशासनाकडून सुरू आहे. ही कारवाई करत असतानाच डॉ. मंझा यांना परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदावरून हटवण्यात आले आहे.




No comments:

Post a Comment

Pages