भीमजयंतीनिमीत्त नागसेनवनात पार पडणार एकदिवसीय आंबेडकरी विद्यार्थी कार्यकर्त्यांची राष्ट्रीय परिषद ; केंद्रीय विद्यापीठांसह देशभरातील विविध विद्यापीठांतील विद्यार्थी कार्यकर्त्यांचा असेल सहभाग - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 23 March 2023

भीमजयंतीनिमीत्त नागसेनवनात पार पडणार एकदिवसीय आंबेडकरी विद्यार्थी कार्यकर्त्यांची राष्ट्रीय परिषद ; केंद्रीय विद्यापीठांसह देशभरातील विविध विद्यापीठांतील विद्यार्थी कार्यकर्त्यांचा असेल सहभाग

छत्रपती संभाजीनगर  :      नागसेनवनातील आजीमाजी विद्यार्थ्यांच्यावतीने भीमजयंतीनिमीत्त नागसेन फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देशभरातील आंबेडकरी विद्यार्थी कार्यकर्त्यांची एकदिवसीय राष्ट्रीय परिषदे दि.१ एप्रिल रोजी नागसेनवनात आयोजित करण्यात आली आहे. यात केंद्रीय विद्यापीठांसह देशभरातील विविध विद्यापीठांतील विद्यार्थी कार्यकर्त्यांचा सहभाग असेल. 


मागील काही वर्षांपासून देशभरात बहुजन विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जातिआधारीत भेदभावाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये कमालीची स्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रातील आंबेडकरी कार्यकर्त्यांना एकत्र येण्याची हाक देत नागसेनवनात प्रथमच विविध आंबेडकरी विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांची एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 


या राष्ट्रीय परिषदेत जेएनयू विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, हैदराबाद विद्यापीठ, पंजाब विद्यापीठ, आयआयटी मुंबई, टिस मुंबई, वर्धा हिंदी विद्यापीठ, स्वरातीम विद्यापीठ, गुजरात केंद्रीय विद्यापीठ, नालंदा विद्यापीठ बिहार, गोंडवाना विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सावित्रीमाई फुले पुणे विद्यापीठ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील सुमारे ६७  प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.


विद्यार्थी प्रश्नांची उकल करण्याचा उद्देश

देशभरातील आंबेडकरी विद्यार्थी कार्यकर्त्यांचा समन्वय निर्माण करून विद्यार्थी प्रश्नांची उकल करणे हे ह्या परिषदेचे उद्धिष्ट आहे. जातिआधारीत भेदभावाचे राजकारण, नवीन शैक्षणिक धोरणाचा बहुजन विद्यार्थ्यांच्या विकासावर होणारा परिणाम, शिक्षणातील बाजारीकरण आदी विषयांवर परिषदेत चर्चा होणार आहे. परिषदेच्या निमित्ताने देशभरातील आंबेडकरी विद्यार्थी कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधला जाणार असल्याचे परिषदेचे निमंत्रक सचिन निकम यांनी सांगितले. 


No comments:

Post a Comment

Pages