छत्रपती संभाजीनगर :
संविधान जनजागृती अभियान आणि परिवर्तनाचे शिलेदार च्या माध्यमातून महाड महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा 97 वर्ष पूर्तीच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील समता संघर्ष प्रेरणाभूमी (वाय कॉर्नर) येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व पत्रकार मंगल खिवंसरा यांचे शिवराय ते भीमराय: एक वैचारिक नातं आणि काळाची गरज या विषयावरती व्याख्यान आयोजित केले होते.
याप्रसंगी बोलताना मंगल खिवंसारा मॅडम यांनी महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यातली समता, स्वातंत्र्य, बंधुता ही महत्वाची मूल्य अधोरेखित केली.अगदी सोप्या भाषेत जमलेल्या तमाम विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नुसतं एकमेकांचे मित्र असण्यापेक्षा तुमची वैचारिक मित्रता असायला हवी असं सांगत असताना त्या म्हणाल्या की 'मला आज सावित्री फातिमा सारख्या मैत्रिणी हव्या आहेत.'
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संविधान जनजागृती अभियानाचे अशोक बनकर यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीक्षा मौर्य यांनी केले असून संविधान सांस्कृतिक जलशाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत 'पाहिलं मी रूप तुझं भीमा महाडच्या पाण्यामधी' हे गीत शाहीर सोनु गायकवाड, अभिजित बांगर यांनी सादर केले.व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन परिवर्तनाचे शिल्लेदारच्या चंचल जगताप यांनी केले.
No comments:
Post a Comment