छत्रपती संभाजीनगर विरोधात ७० हजार तर समर्थनार्थ केवळ हजार अर्ज दाखल - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 23 March 2023

छत्रपती संभाजीनगर विरोधात ७० हजार तर समर्थनार्थ केवळ हजार अर्ज दाखल

छत्रपती संभाजीनगर :

छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराच्या निर्णयाविरोधात आक्षेप आणि हरकती नोंदवण्यासाठी 27 मार्चची अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे अवघ्या तीन दिवसांचा कालवधी शिल्लक राहिला असताना समर्थनात आणि विरोधात हजारो अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल होताना पाहायला मिळत आहे. आजपर्यंत जवळपास 70 हजार अर्ज हे नामांतर विरोधात तर समर्थनार्थ केवळ हजारभर अर्ज असल्याची माहिती समोर आली आहे.


एकाच दिवसात 24 हजार आक्षेपाचे अर्ज विभागीय आयुक्त कार्यलयात दाखल झाले आहेत. तर नामांतराच्या समर्थनात आणि विरोधात दाखल होणाऱ्या अर्जातून आपली भूमिका भक्कमपणे मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळेच दोन्ही बाजूने अधिकाधिक अर्ज दाखल करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागात मोहीम राबवत कॅम्प देखील लावण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment

Pages