किनवट मध्ये अवैध सागवानाचे 21 नग जप्त - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 23 April 2023

किनवट मध्ये अवैध सागवानाचे 21 नग जप्त

किनवट,दि.23(प्रतिनिधी) :  गोकुंदा ते कोठारी मार्गावर वनविभागाच्या  पथकाने शुक्रवारी (दि.21) सायंकाळी चारच्या सुमारास अवैध सागवानाचे 21 नग दुचाकीवरून वाहतूक करताना पकडले. तस्कर मात्र अंघाराचा लाभ घेऊन पसार झाला.


        दररोजच्या शिरस्त्याप्रमाणे शुक्रवारी दुपारनंतर किनवट वनविभागाच्या पथकाचा गोकुंदा ते सागवान तस्करीसाठी कुख्यात  असलेल्या  चिखली मार्गावर गस्त घालणे सुरू होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून चिखली कडून एक स्वार पाठीमागच्या सीटवर काहीतरी झाकून आणतांना आढळले. त्यास वनकर्मचाऱ्यांनी हटकले असता, तो तत्काळ पाठीमागे वळून थोडे अंतर गेल्यावर मागील सागवानाचे लठ्ठे रस्त्यावरच टाकून पळून गेला. तपासणीत ती गैरमार्गाने तोडलेली  सागवानाची फर्निचरसाठी कापलेली कटसाईज एकूण 0.0941 घनमिटर असलेले 21 नग होते.  सदर अज्ञात तस्कराविरुद्ध प्र.गु.र.क्र. 06/2023 नुसार वनगुन्हा नोंद करून ते सागी नग राजगड येथील आगारात जमा करण्या आले. उप वनसंरक्षक वाबळे व सहायक वन संरक्षक गिरी आणि वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद राठोड या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यवाही वनपाल एस. एम. कोम्पलवार, सांगळे, यादव, एम.एन.कत्तूरवार व वनरक्षक रवी दांडेगावकर, झंपलवाड, फोले आणि वाहन चालक बाळकृष्ण आवळे यांनी पार पाडली.

No comments:

Post a Comment

Pages