डॉ.आंबेडकर जयंती शहर व परिसरात मोठ्या उत्साहात साजरी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 14 April 2023

डॉ.आंबेडकर जयंती शहर व परिसरात मोठ्या उत्साहात साजरी

किनवट,ता.१४(बातमीदार): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज (ता.१४) शहर व परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.जयंतीचा मुख्य सोहळा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ सकाळी ११ वाजता संपन्न झाला.यावेळी आमदार भीमराव केराम ,माजी आमदार प्रदीप नाईक ,भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके,शहर व तालुका फुले-आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितिचे अध्यक्ष अॅड.सम्राट मिलिंद सर्पे, माजी नगराध्यक्ष के.मुर्ती,आनंद मच्छेवार, साजिद खान,अजय कदम,सुरेश जाधव, विनोद  भरणे यांच्यसह अपस्थित मान्यवरांनी डॉ.आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

 जयंती निमित्त गुरुवारी मध्यरात्री डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अॅड.सम्राट सर्पे यांच्या नेतृत्वाखाली रिपाइं चे तालुकाध्यक्ष विवेक ओंकार व आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अॅड.मिलिंद सर्पे यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.जयंती निमित्त आज सकाळी ७ वाजल्यापासून १० वाजेपर्यंत उत्तम कानिंदे यांच्या संकल्पनेतून भीम पहाट हा सुरेश पाटील व संचाचा बहारदार गायनाचा कार्यक्रम झाला.११ वाजता जयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी शहरातून मोटारसायकल फेरी काढली.दुपारी बसस्थानकात व सिद्धार्थ नगरातील जेतवन बुद्ध विहारात अभिवादनाचा व भोजन दानाचा कार्यक्रम पार पडला.

  या कार्यक्रमास श्रीनिवास नेम्मानिवार, मारोती भरकड, नारायणराव सिडाम,माधव कावळे,अर्जुन आडे,अभय महाजन,अॅड.के.के.साबळे, बालाजी धोत्रे,अशोक नेम्मानिवार,राहुल कापसे, महेंद्र नरवाडे,अनिल उमरे, गिरीश नेम्मानिवार,प्रशांत कोरडे,अॅड.संदिप कांबळे,वकील संघाचे अध्यक्ष अॅड.राहुल सोनकांबळे,अॅड.सुनिल येरेकार,सुधाकर भोयर,अनिल क-हाळे, उमाकांत क-हाळे, आनंद भालेराव शुभांगी ताई ठमके,करुणा आळणे, सूर्यकांता सर्पे, गंगुबाई परेकार,स्मिता कानिंदे,अॅड.आकांक्षा आळणे, कल्पना सर्पे  यां च्यासह विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, डॉक्टर,वकील, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सायंकाळी पाच वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.


No comments:

Post a Comment

Pages