जयवर्धन भोसीकर
(नांदेड) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न, प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जयंतीनिमित्त नांदेड येथील त्यांच्या पुतळ्यास भव्य पुष्पहार घालून आणि गगनभेदी घोषणा देत सुप्रसिद्ध सामाजिक संस्था ' प्रज्ञासूर्य समता परिषद ' (psp) तर्फे भव्यअभिवादन करण्यात आले. प्रज्ञासूर्य समता परिषदेचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. विलासराज भद्रे ह्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ह्या अभिवादन सोहळ्यास संस्थेचे सल्लागार डॉ. श्रीहरी कांबळे, डॉ.भीमराव वनंजे,विजय भोरगे, राज गोडबोले
संस्थेचे पदाधिकारी राजशेखर सोनसळे, प्राचार्य पद्माकर जोंधळे, प्रा.विलास गोपाळे, निवृत्तीराव झडते,प्रतिभाताई सोने, तेजस्विनी भद्रे तसेच बी. के. कांबळे,कुलदीप नंदूरकर, गंगाधर झिंझाडे,निशांत सोने,शेख जहीर,विजय डोईबळे ,अंजनाताई भेरजे,सिद्धार्थ भेरजे,संध्याताई एडके,
कल्पना कदम,विजयाताई सोनसळे, ममताताई एडके आदी मान्यवरांसहित प्रज्ञासूर्य समता परिषदेच्या विविध आघाड्यांचे अनेक पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
ह्यावेळी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आगामी 5 वर्षात प्रत्येक स्वाभिमानी घरात प्रज्ञासूर्य समता परिषदेचे ध्येय,उद्दिष्टे आणि कार्य सर्वदूर पोचवण्यासाठी लवकरच विविध आघाड्यांची स्थापना करण्याचा संकल्प अध्यक्ष डॉ.विलासराज भद्रे य जाहीर केला.
No comments:
Post a Comment